व्हिडिओ

गडचिरोलीत पुन्हा आरोग्यव्यवस्थेचे निघाले धिंडवडे; दुचाकीवर खाटेला बांधून मृतदेहाचा प्रवास

वेळेवर शववाहिका उपलब्ध नसल्याने शव दुचाकीवर खाटेला बांधून गावी नेण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे

Published by : Team Lokshahi

गडचिरोली: जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दुर्गम नक्षलग्रस्त असलेल्या कृष्णार येथील एका २३ वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण करण्यात येत आहे.

१७ जुलै रोजी गणेश तेलामीची प्रकृती ढासळल्याने गंभीर अवस्थेत हेमलकसा येथे त्याला भरती करण्यात आले होते. हेमलकसा येथे उपचारही सुरू होता मात्र तीन दिवसानंतर २० जुलैला उपचारादरम्यान गणेशचा मृत्यू झाला. दरम्यान भामरागड येथे वेळेवर शववाहिका उपलब्ध नसल्याने शव दुचाकीवर खाटेला बांधून गावी नेण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हा प्रकार लक्षात येताच खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शववाहिका पाठवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत प्रेत गावात पोहोचले होते. भामरागड इथे रुग्णांसाठी मोबाइल बाईकसुद्धा पुरवल्या गेल्या आहेत. मात्र वेळेवर चालक उपलब्ध होत नसल्यामुळे या बाईकचा रुग्णांना फारसा उपयोग होत नाही.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती