माजी पोलीस अधिकारी संजय पांडे निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहेत. संजय पांडेंकडून विधानसभेसाठीच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरु करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या झुलेलाल मंदिरात दर्शन घेऊन संजय पांडे यांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
संजय पांडे वर्सोवा विधानसभेतून अपक्ष लढणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे. माजी पोलीस अधिकारी संजय पांडे विधानसभेची निवडणूक लढणार असून त्यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे.