व्हिडिओ

Kolhapur : कोल्हापुरात 10 लाखांचे विदेशी मद्य जप्त,राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Published by : Dhanshree Shintre

कोल्हापुरात 10 लाखांचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. महागड्या मद्याच्या 10 लाखांचा साठा आणि 6 लाखांचे वाहन जप्त केलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई केली आहे. दारूचा साठा करणारा संशयिताला पथकाने ताब्यात घेतलेलं आहे. कोल्हापूर शहरातील राजारामपुरी येथे ही कारवाई करण्यात आलेली आहे.

आयात केलेला महागड्या मद्याच्या 10 लाखांचा साठा आणि 6 लाखांचे वाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून जप्त केले आहे. ही कारवाई कोल्हापूर शहरातील राजारामपुरी 9 व्या गल्लीत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे एकाच वेळी करण्यात आली आहे. दारूचा साठा करणारा संशयित अनिरुद्ध अरुण राऊत याला पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान या गुन्ह्यातील त्याच्या अन्यसाथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती देखील उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दिली आहे.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा