व्हिडिओ

NCP MLA Disqualification Result: निकालानंतर अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाने नुकताच निकाल देऊन अजित पवार यांना पक्षाचे अध्यक्ष असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला.

Published by : Dhanshree Shintre

पक्षात शरद पवारांचा गट आणि अजित पवारांचा गट अशी फूट पडली. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर गेला. निवडणूक आयोगाने नुकताच निकाल देऊन अजित पवार यांना पक्षाचे अध्यक्ष असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या निकालानंतरची अमोल मिटकरी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे हे आमच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आदरणीय अजित दादाच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी जो निकाल दिला होता पक्ष आणि पक्ष चिन्ह आलं आणि त्यानंतर आज माननीय विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल वाचून दाखवला त्यामध्ये सर्व आमदार पात्र ठरवले गेले याचा मला अभिमान आहे आनंद आहे. आमच्या प्रत्येक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी ही खूप महत्वाची बाब आहे. मी माननीय विधानसभा अध्यक्षांच मनापासून आभार मानतो. आदरणीय अजित दादांचसुद्धा या निमित्ताने आभार मानतो.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha