जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन ते तीन रुपये किलो कांद्याला भाव मिळत असल्याने शेतातील कांदे काढणे शेतकऱ्याला परवडत नसून अनेक शेतकऱ्यांनी कांद्याच्या पिकावर रोटावेटर फिरवून शेतातील कांदे उपटून फेकले आहेत. एकीकडे अवकाळी व दुष्काळाच्या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना दुसरीकडे मात्र कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हा हवालदार झाला आहे. तर या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शरद पवार गटाच्या वतीने शासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्याच्या कांद्याला भाव द्यावा अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा शरद पवार गटाने दिला आहे.