दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्राचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर पुन्हा आंदोलन झालं आहे. सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस, निमलष्करी दलाचे जवान तैनात आहेत. आंदोलकांनी रस्ते बंद केल्याने दिल्लीत वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळत आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना आंदोलकांना किंवा वाहनांना राजधानीत प्रवेश न देण्याच्या सूचना देण्यात आले आहे. हमीभावाच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाले आहेत. केंद्राचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर 200 हून अधिक संघटनांच्या शेतकऱ्यांनी "दिल्ली चलो" चा नारा दिला आहे. आंदोलक शेतकऱ्यांचा मोर्चा पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली असतानाही शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं. दरम्यान दिल्ली-हरियाणा सीमेवर पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना शहरात येण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलीस सज्ज झाले आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोणत्याही आंदोलकांना किंवा वाहनांना राजधानीत प्रवेश न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक रस्ते बंद केल्यामुळे राजधानी दिल्लीत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.