जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने जुन्या पेन्शन बाबत निर्णय न घेतल्यास सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने रियाज मुलाणी यांनी दिलाय. दोन ऑक्टोंबर पासून वर्धा येथे 16 कर्मचारी आमरण उपोषणाला बसले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंढरपूरमध्ये दोन दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे