विरारमध्ये हायव्हॉल्टाज ड्रामा पाहायला मिळत आहे. विरारमध्ये विनोद तावडे यांंनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि विनोद तावडे यांच्यात यावेळी बाचाबाची झाली. हितेंद्र ठाकूर यांच्याकडून विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळेच, विरारच्या हॉटेलमध्ये वातावरण तापलं आहे. दरम्यान, विनोद तावडे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडून विनोद तावडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पैसे वाटण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये राडा झाला आहे.