मुंबई : सिंधुदुर्गात देशातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देण्यात येणार होती. परंतु, हा प्रकल्प आता गुजरातच्या द्वारका येथे होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरुन आता विरोधकांनी आता सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाणबुडी प्रकल्प राज्यातून बाहेर जाणार नाही, अशी ग्वाही शिंदेंनी दिली आहे. खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.