मुंबई : शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मिशन- 48 साठी एकनाथ शिंदेंनी आता कंबर कसली असून शिवसंकल्प अभियानाद्वारे सभा घेण्यात येणार आहे. या यात्रेचा शुभारंभ करताना एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली आहे. वेळ आली तेव्हा ठाकरे टुणकन उडी मारून सीएम झाले. मुख्यमंत्री बनून आत्तापर्यंत काय केलं, असा सवाल शिंदेंनी विचारला आहे. तर, खोटं बोलून त्यांनी शिवसेना-भाजपसोबतची युती तोडली. शिवसेनेचं खच्चीकरण थांबवण्यासाठी पाऊल उचलंल. पंतप्रधान मोदींनी बाळासाहेबांची स्वप्न पूर्ण केले. खोटं बोलणाऱ्यांना त्यांची जागा दाखवावीच लागेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.