थोडक्यात
महाविकास आघाडीने लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात दोन वेळा दावं दाखल केलं, ज्यावर न्यायालयाने त्यांना फटकारलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे नेते 'योजना बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याची' भाषा वापरत असल्यावर प्रतिक्रिया दिली.
शिंदे यांनी सांगितले की, लाडकी बहिण योजना सुरू राहण्यासाठी ते दहा वेळा जेलमध्ये जाण्यास तयार आहेत.
4o miniलाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी महा विकास आघाडी दोनदा न्यायालयात गेली असून न्यायलयाने त्यांना फटकारले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास या योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांना जेल मध्ये टाकण्याची भाषा महाविकास आघाडीचे नेते करत असून लाडकी बहिण योजना सुरू राहण्यासाठी एका वेळा काय दहा वेळा जेलमध्ये जाण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.