नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज समृद्धी महामार्गाची पाहणी करत आहेत. हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे 11 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर समृद्धी हायवे लोकांसाठी खुला होणार आहे. या महामार्गांच्या उद्घाटच्या नियोजनाची पाहणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत आहेत. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकाच गाडीत बसले होते. उपमुख्यमंत्री स्वतः ड्रायव्हिंग सीटर बसून शेजारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते.