दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे आक्रमक नेते संजय सिंह यांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता. बुधवारी टाकलेल्या छाप्यानंतर त्यांना सायंकाळी अटक करण्यात आली आहे.
आज दिल्लीच्या साऊथ अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात येणार आहे. ईडी कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या अटकेचा निषेध केला आहे. तर भारतीय जनता पक्षाने आपच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली आहेत.