रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे. रोहित पवार यांच्या समर्थनार्थ शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. रोहित पवार यांची चौकशी सुरू असताना शरद पवार हे NCP ऑफीसमध्ये उपस्थित असतील. तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या जवळच ईडीचं कार्यालय आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ईडी कार्यालयाच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.