मराठवाडा भूकंपाने हादरला! नांदेड येथे अनेक भागात गुरुवारी सकाळी ६ वाजून ८ ते ९ मिनिटाच्या दरम्यान दहा सेकंद ४.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर पासून १५ किलोमीटरवर दाखवला जात आहे.
हिंगोलीतील वसमत, औंढा नागनाथ ,कळमनुरी,हिंगोली तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरपासून १५ किलोमीटरवर दाखवला जात आहे. ४.५ आणी ३.६ रिश्टर स्केल एवढी भूकंपाची नोंद केली गेली आहे.