ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणी चेअरमन सुरेश कुटे यांनी 374 कोटी रुपये स्वतःच्या कंपन्यांसाठी वापरल्याची माहिती समोर आली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या 60 ठेवीदारांनी पोलिसांमध्ये तक्रारी केलेल्या आहेत. जास्त परतावा मिळण्याचे खातेदारांना प्रलोभन दिले होते. फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रारी करण्याचे आवाहन पोलिसांनी केलेले आहे.
दरम्यान ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणीमध्ये बराचशा लोकांना जास्त परतावा देण्याचा आमिष देण्यात आलं आणि त्यानंतर लोकांनी आपल्या मेहनतीचा पैसा इथं गुंतवला पण त्यांचा या ठिकाणी फसवणूक झाल्याचं लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे तक्रारी केल्या जात आहेत.