राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे. दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवारांकडे येण्याची दाट शक्यता वर्तावली जात आहे. याआधी सुद्धा दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. शरद पवारांकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठं खिंडार पाडण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत.
यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, वेगवेगळ्या पक्षाच्या भूमिका या स्थानिक अडचणींच्या संदर्भातल्या आहेत तशी काही गंभीर आणि वेगळी भूमिका नाही. तसेच आमची निवडणुक आहे ती अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालीच लढली जाईल आणि आम्ही तिन्ही पक्ष एकोप्यानेच निवडणुक लढू काही मतभेद नाही. तर आमच्या निवडणूका ह्या महायुतीतूनच लढल्या जातील.
यापार्श्वभूमीवर रोहित पवार म्हणाले की, बरेच लोक संपर्कात आहेत. पवार साहेबांच मत आहे सगळ्यांनाच घेऊन फायदा नाही काही निष्ठावंताना पण संधी द्यावी लागेल. त्यामुळे आता पवार साहेब ठरावीक लोकांचाच विचार करतील आणि तो ठरावीक आकडा जो आहे तो कमी असू शकतो. महाराष्ट्र धर्म सोडून तुम्ही जी चाकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याबद्दल त्यांच्या मतदार संघामध्ये अतिशय नकारात्मक वातावरण आहे.
त्या लोकांना आपल्याकडे घेऊन राजकीय दृष्टीकोनातून तो निर्णय चुकू शकतो त्यापेक्षा निष्ठावंताना आपण पाठिंबा दिला तर लोक आपल्यासोबत आहेतच. ही भूमिका पवार साहेबांची आणि महाविकास आघाडीची बघितल्यानंतर अजून जास्त सामान्य नागरिक मतदार आपल्याकडे वळू शकतील असं पवार साहेबांच मत झालेलं आहे.