मुंबईच्या धारावीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. धारावीमध्ये धार्मिक स्थळ तोडण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. पालिकेंच्या वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. महापालिकेला तोडकाम करण्यापासून धारावीतील लोकांकडून रोखण्यात आलं आहे. मुंबईतील धारावीमध्ये आता तणावाची स्थिती निर्माण झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय. यावेळी सेकडो नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे.
धारावी पूनर्विकासाच्या जागेवर जी काही मस्जिद आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने ते तोडकाम करण्यात आलं आहे. मात्र स्थानिक नागरिकांनी मुस्लिम समाजच्या नागरिकांनी याठिकाणी विरोध केलेला आहे. यासंदर्भात रात्री काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.