कृषीमंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी लातूरचं सोयाबिन संशोधन केंद्र आणि गोवंश संशोधन केंद्र परळीला पळवल्याचा आरोप होऊ लागलाय. लातूर जिल्ह्यात सोयाबिन संशोधन केंद्र होणार होतं. अगोदरचे कृषीमंत्री दादा भुसे आणि अब्दुल सत्तार यांनी ही संशोधन केंद्र लातूरलाच व्हावीत अशी भूमिका मांडली होती. पण नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत सोयाबिन संशोधन केंद्र आणि देवणी, लाल कंधारी या गोवंशाचे संशोधन केंद्र परळीला होणार असल्याची घोषणा झालीय. कृषीमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याचे प्रयत्न करण्याऐवजी अशी पळवापळवी