व्हिडिओ

Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

Published by : Dhanshree Shintre

आपल्याला कल्पना आहे की जलयुक्त शिवार 2 ही योजना आता आपण सुरु केलेली आहे आणि जल हेच जीवन आहे आणि ज्या ज्या वेळी दुष्काळ पडतो त्यावेळी जलसंधरणाची महती काय आहे हे आपल्याला लक्षात येते. जेव्हापासून आपण ही जलयुक्त शिवारची कामं केली आहेत तेव्हापासून दुष्काळाच्या काळातही काही ना काही प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी लोकांना दिलीसा देऊ शकतो. हे जलरथ जलसाक्षरता करणार आहेत. केंद्र सरकारच्या योजना, राज्याच्या योजना त्याच्यासोबत जलशिवार 2 च्या योजना या सगळ्या योजना ज्या आहेत त्या सगळ्या योजना लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचवल्या जाणार आहेत. हर घर जल हा एक मोठा कार्यक्रम केंद्र सरकारने जो हातामध्ये दिला जो आपल्या राज्याने राबवलेला आहे तर त्याची देखील माहिती ही प्रत्येक व्यक्तीकडे पोहोचवण्याचे काम या माध्यमातून आपण करणार आहोत.

यासोबतच फडणवीस हे म्हणाले की, ज्या काही घटना घडलेल्या आहेत या व्यक्तीगत वैमनस्यातून घडलेल्या घटना आहेत. त्या गंभीरच आहेत त्याची गंभीरता मी नाकारत नाही पण व्यक्तीगत वैमनस्यातून घडलेल्या घटना आहेत. त्याच्यामुळे याचा थेट कायदा आणि सुव्यवस्था किंवा राज्याची परिस्थिती त्यांच्याशी संबंध जोडने योग्य-अयोग्य आहे. प्रत्येक ज्या काही दोन-तीन घटना आहेत त्याच्या पाठीमागे काही वयक्तिक कारणे आहेत, त्यांची काही भांडणे आहेत, त्यांची काही व्यवहार आहेत आणि त्यामुळे त्याही बाबतीत आम्ही जी काही कारवाई करायची आहे ती कडक कारवाई करतो.

अभिनेत्री कंगना रणौतला दिलासा; इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

Bollywood stars Ganesha 2024 : बॉलीवूड कलाकारांच्या घरी बाप्पा! पाहा फोटो

Local Mega Block : गणेशोत्सवानिमित्त रेल्वे प्रवाशांना दिसाला

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News