भारताचा स्टार कुस्तीपटू आणि नुकताच काँग्रेसमध्ये सामील झालेल्या बजरंग पुनियाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. कुस्तीपटूने सांगितले की, त्याला विदेशी नंबरवरून ही धमकी मिळाली होती. त्यात लिहिले आहे की, ‘बजरंग काँग्रेस सोड अन्यथा तुझी आणि तुझ्या कुटुंबाची खैर नाही. हा आमचा शेवटचा मेसेज आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही काय आहोत ते दाखवून देऊ. तुला कुठेही तक्रार करायची असेल करं, हा आमचा पहिला आणि शेवटचा इशारा आहे.’ यानंतर बजरंगच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.