राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम व छोटा शकील गॅंग कडून एकनाथ खडसेंना मोबाईलवर धमकी आल्याची माहिती आहे. 15 व 16 एप्रिल रोजी वेगवेगळ्या नंबर वरून एकनाथ खडसेंना फोन करून धमकी देण्यात आल्याची माहिती आहे.
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. देशासह परदेशातील क्रमांकावरून अज्ञातांनी फोन करत धमकी दिली. एकनाथ खडसे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आहे.