छत्रपती संभीज महाराजांनी अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला चला असं आवाहन केल्यानंतर दरेकरांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवस्मारकाच्या बाबतीत राज्य सरकार ठाम आहे. त्यासंदर्भातील अनेक कामे गतीने सुरुयेत. स्मारकाच्या बाबतीत कुठेही किंतु, परंतु सरकारच्या मनात नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे आणि निश्चितच स्मारकाचं काम होईल.
विविध पक्षाचे विविध जाती धर्माचे लोकं या सगळ्यांमध्ये एक वाक्यता आहे, शिवस्मारकाच्या बाबतीत राजकारण होता कामा नये. शिवस्मारक हा सर्वांचा अस्मितेचा विषय आहे तो राजकारणाचा विषय होता कामा नये, जर हा विषय राजकारणाचा झालाच तर त्याचं गांभीर्य कमी होईल असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.