शिवकालीन दांडपट्ट्याला नवी ओळख मिळणार आहे. अधिकृत राज्यशस्त्र म्हणून दांडपट्ट्याची आज घोषणा होणार आहे. आज संध्याकाळी आग्रा येथे होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना दांडपट्ट्याचा अध्यादेश सुपूर्द करणार आणि दांडपट्टा हे राज्यशस्त्र घोषित होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात घोषणा केली आहे. आग्रा येथे होणाऱ्या शिवजयंती कार्यक्रमात घोषणा होणार आहे. दांडपट्टा हा मराठा सैन्याचं वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र आहे आणि त्याचं महत्त्व अधोरेखित होण्यासाठी दांडपट्टा राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे.