बीडनंतर आता धाराशिवमध्ये देखील संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मराठा आंदोलनामुळं मराठवाड्यात स्फोटक परिस्थिती पाहायला मिळते आहे. जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनं हा निर्णय घेतला असून, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, दुकाने, आस्थापना यांनाही लागू राहतील. या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तीना एकत्र येता येणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत. राजकीय नेत्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला.