व्हिडिओ

आंबेनळी घाटातून प्रवास करताय? मग थांबा...

Published by : Team Lokshahi

सातारा: रायगड जिल्‍हयातून सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात (Ambenali ghat) दरड कोसळण्याच्या घटनेत वाढ होत असल्याने, पोलादपूर ते महाबळेश्वर या मार्गावर सर्व प्रकारची वाहतूक पंधरा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय रायगड च्या जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला आहे.

28 जून 2023 पासून आंबेनळी घाटात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. रायगड पोलीसांकडून यापूर्वीच हा मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, मात्र तरिही छोट्या वाहनांचा प्रवास सुरू होता.

जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढल्यानंतर महाड प्रांताधिकारी यांनी पहाणी केली. दरम्याम अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता पुढील पंधरा दिवस हा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Diwali 2024: फराळासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामध्ये असू शकते भेसळ! अशाप्रकारे ओळखा भेसळ...

MVA Press Conference: निवडणूक आयोग भाजपची बी टीम, संजय राऊतांचा निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टावर गंभीर आरोप

दम असेल तर...; महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमधून नाना पटोलेंनी दिलं महायुतीला आव्हान

भारताची वाढती लोकसंख्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हान

Israel - Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम? हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार