बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. आतापर्यंत आलेल्या कलानुसार सत्ताधारी गटाचे नेते व माजी आमदार के.पी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने 1600 मतांची आघाडी घेतली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 89.03 टक्के मतदान झाले. 120 टेबलवरती ही मतमोजणी सुरू आहे. सुरवातीला केंद्रवाईज 50-50 मतांचे पॅनल टू पॅनेल झालेले मतदान अशी विभागणी करण्यात आली. यामध्ये काही केंद्रावर सत्ताधारी गटाचे तर काही केंद्रावर विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे उमेदवार आघाडीवर राहत होते.