छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद परत एकदा पाहायला मिळाला आहे. आज छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे हे ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्याकडे पाठ करून निघून गेले.
मान्यवरांना भेट देण्यासाठी पालकमंत्री संदिपान भुमरे येत असताना चंद्रकांत खैरे यांनी काढता पाय घेतला आहे. चंद्रकांत खैरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर शिंदे गटाचे नेते भडकले आहेत. यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. तर यावर चंद्रकांत खैरे आणि संदिपान भुमरे यांसोबत संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.