व्हिडिओ

Contract Recruitment : राज्यात पुन्हा कंत्राटी भरती, कंत्राटी पद्धतीने पद भरण्यास सरकारची मंजूरी

Published by : Dhanshree Shintre

राज्यात पुन्हा कंत्राटी भरती होणार आहे. शासकीय वैदकीय महाविद्यालयात 6 हजार 830 पदांसाठी कंत्राटी भरती केली जाणार आहे. कंत्राटी पद्धतीने पद भरण्यास सरकारची मंजूरी आहे. शासनाचा 2023 मध्ये कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय होता आणि त्यासंदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

शासकीय वैद्याकीय, आयुर्वेदिक, होमिओपॅथी महाविद्यालये व रुग्णालयांकरिता ‘गट-क’ व ‘गट- ड’ या संवर्गातील मंजूर 6 हजार 830 पदे बाह्यस्राोतामार्फत भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे, ‘क’ दर्जाच्या कुशल मनुष्यबळाच्या पदांचाही या कंत्राटी भरतीमध्ये समावेश आहे. मात्र, हा निर्णय केवळ मंत्रालय किंवा शासकीय विभागापुरता मर्यादित न ठेवता सरकारने त्याची व्याप्ती थेट महापालिका, नगरपालिका, महामंडळांपर्यंत वाढवल्याने विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलन उभारले.

अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...