सोलापुरच्या जागेमुळे महाविकास आघाडीत मतभेद होण्याची शक्यता आहे. काँग्रेस उमेदवाराला उद्धव ठाकरेंच्या सेनेचे लोक मतदान करणार नाहीत असा मोठा गौप्यस्फोट भाजप नेते प्रविण दरेकर यांनी सोलापुरात केला आहे. उद्धव ठाकरेंना धक्का देण्याचे काँग्रेसचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.
सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसने ठाकरे गटाच्या अमर पाटील यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.