सतेज औंधकर, कोल्हापूर
पुणे-बंगळुरू महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या आंदोलनात काँग्रेस नेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजीत कदम, काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने आणि दुरावस्था झाल्याने काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येणार आहे. पेठ, कराड, सातारा, खेड-शिवापूर टोलनाक्यावर हे आंदोलन करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता हे आंदोलन केलं जाणार आहे.