कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणुक काँग्रेस लढवणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं कंबर कसली आहे. राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेस निवडणूक लढवणार असल्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असे समीकरण पहायला मिळेल ही शक्यता आहे. नवी मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक झाली या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान उपस्थित होते. संघटना मजबूत करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले असे नाना पटोले म्हणाले.