क्रॉस व्होटिंग करणारे काँग्रेस आमदार निलंबित होणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती आहे. विधानपरिषदेत क्रॉस व्होटिंग केल्यानं 6 वर्षासाठी निलंबन होणार असल्याचं कळालं आहे. विधान परिषद निवडणुकीत मतं फुटल्यानं काँग्रेस अॅक्शन मोडवर आलेली आहे. काँग्रेसमधील 7 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे.
विधान परिषद निवडणुकीमध्ये, काँग्रेस पक्षातील काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे महाविकास आघाडीच्या तिसऱ्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याविरुद्ध काँग्रेस हाय कमांड अॅक्शन मोडवर आलेला आहे. या सर्व आमदारांना, काँग्रेस पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करणार आहे अशी सूत्रांची माहिती मिळत आहे. निलंबनासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले या संदर्भात हाय कमांडची भेट घेणार आहेत.