समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील उत्तर प्रदेशमधील जागावाटपाचा अडथळा आता दूर झाला आहे. दोन्ही पक्षांनी बुधवारी राज्यात इंडिया आघाडीअंतर्गत जागावाटपाची औपचारिक घोषणा केली. या अंतर्गत राज्यातील 80 जागांपैकी काँग्रेस रायबरेली आणि अमेठीसह 17 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल, सपचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र चौधरी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय आणि काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी ही घोषणा केली. काँग्रेस 17, तर राज्यातील उर्वरित 63 जागांवर सप आणि इतर सहकारी पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवतील. सपाने मध्य प्रदेशातील खजुराहो लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही मागणी काँग्रेसने मान्य केली आहे.