मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोड-वांद्रे सी-लिंक मार्गाचं उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटन सोहळ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गैरहजेरी दिसून आली. प्रवाशांचा 70 टक्के वेळ आणि 34 टक्के इंधनाची बचत होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे. तर आजपासून पश्चिम उपनगरातून सुसाट होणार असं दिसतं आहे. मात्र अजित पवारांची दांडी असल्यामुळे अजित पवार महायुतीमधून बाहेर पडतात का? अशा प्रश्नांना उधाण येत आहे.
तर अजित पवारांच्या मनात नेमक चालू काय आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. मागच्या वेळेला गृहमंत्री अमित शाहा हे मुंबईमध्ये उपस्थित होते मात्र त्यावेळेला देखील अजित पवार त्याठिकाणी उपस्थित नव्हते, आणि आता कोस्टल रोड-वांद्रे सी-लिंक मार्गाच्या उद्घाटन सोहळ्याला देखील अजित पवार यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली आहे. तसेच ज्याप्रकारे आता भाजपकडून बॅनरबाजी केली जात आहे त्यात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिसत आहेत मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार त्यात कुठेच दिसत नाही आहेत. त्यामुळे महायुतीला एक वेगळचं वळन लागलेल आहे.