व्हिडिओ

CM Shinde : एस टी महामंडळाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक, यावर होणार चर्चा

Published by : Team Lokshahi

एस टी महामंडळाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर ही बैठक होणार आहे आणि त्यावर चर्चा होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळाव अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मविआच्या वेळेत देखील एस टी महामंडळाने आंदोलन पुकारलेलं होत आणि सरकारी खात्यामध्ये विलिनीकरण करावं अशी मागणी केली होती.

यावेळेस देखील एस टी कर्मचारी आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी संपाची हाक दिली आहे यादरम्यान आज त्यांच्या संपाचा दुसरा दिवस आहे. सनासुदीच्या काळात आता सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे असं दिसत आहे. तर एस टी महामंडळाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत या समस्येवर काय तोडगा निघणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे.

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र; पत्रात काय?

कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरण; 41 दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे

Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना

वडीगोद्रीतून अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता केला खुला

Akola : अकोला कृषी विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन