लाडकी बहिण योजनेला हात लावल्यास करेक्ट कार्यक्रम करणार असा इशारा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना दिला आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर महायुतीचे सरकारचे सगळे निर्णय रद्द करण्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा दरम्यान दिला होता. त्याला आता मुख्यमंत्री पलटवार करत आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले होते, एक दोन महिने थांबा आमचं सरकार येत आहे आणि ही जी काय तुमची मस्ती आहे ना, 11 दिवसात तब्बल 1600 साशन निर्णय जारी यातले अनेक निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. जे माझ्या राज्याच्या मुळावर येणारे निर्णय आहेत. जे तुमच्या विकासकांचे, बिल्डरचे, मित्रांचे झोळ्या भरणारे निर्णय आहेत ते आम्ही रद्द करू आणि तुमच्यावर देखील गुन्हे दाखल करु. तसेच सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगत आहोत तुम्ही या पापात सहभागी होऊ नका नाही तर तुम्हाला देखील आम्ही तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही.
यावर प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सर्व या योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही. खुलेआम बोलायला लागले आहेत एवढ तरी कळायला हवं लोक सगळे विरोधात जातील कारण लाडकी बहिण योजनेला कोण हात लावायला गेला त्याचा कार्यक्रमच झाला समजा. कारण आमच्या लाडक्या बहिणी अजिबात ऐकूण नाही घेणार लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याचं आम्ही ठरवलं आहे.