पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्याबाबत सर्वांना आवाहन केला आहे. या पार्श्भूमीवर आज केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असताना यावेळी त्यांनी कागल येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन विधिवत प्रार्थना केली. यानंतर स्वतः मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी हातात झाडू घेऊन या मंदिर परिसरातील कचरा साफ करत स्वच्छता केली आहे. यावेळी मंत्री शिंदे यांनी कागल येथील सफाई कामगारांशी देखील संवाद साधत चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे अनेक नेते उपस्थित होते.