सातारा लोकसभेवरुन महायुतीत दावेप्रतिदावे सूरु झाले आहेत. सातारा लोकसभेवर शिवसेनेने दावा केला आहे. उमेदवारीवरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपणार असल्याची चिन्हे आहेत.
सातारा लोकसभेवर यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेचाच हक्क राहील आणि वरिष्ठांनी आदेश दिल्यास लोकसभा लढवणार,अशी माहिती शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिली आहे.