महेश महाले, नाशिक
नाशिकमध्ये सिटी लिंक कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन सुरु झाले आहे. वेतनवाढीसह विविध मागण्यांठी कर्मचाऱ्यांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. मूळ वेतनात 12 हजार आणि प्रोत्साहन भत्ता वाढवावा ही प्रमुख मागणी या चालकांची आहे.
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली असल्याची माहिती मिळत आहे. नाशिक शहराची प्रवासी वाहतूक सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे.
महापालिका परिवहन मंडळाला पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र अद्यापही यावर निर्णय न झाल्याने आंदोलन करण्यात येत आहे.