नवी मुंबई पोलिसांच्या हद्दीतून 4 डिसेंबर रोजी 24 तासात एकूण सहा मुले बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 12 ते 15 वयोगटातील मुलांच्या अपहरणाचे गुन्हे त्यांच्या पालकांच्या तक्रारीनंतर कामोठे, कोपरखैरणे, पनवेल शहर, रबाळे आणि कळंबोली पोलीस ठाण्यात सोमवारी नोंदवण्यात आले आहेत. कळंबोली येथील 13 वर्षांची मुलगी 3 डिसेंबर रोजी तिच्या वर्गमित्राच्या वाढदिवसाला गेली आणि ती परत घरी आलीच नाही. मात्र, नवी मुंबईमध्ये बेपत्ता झालेल्या मुलांच्या घटनेवरून पुन्हा एकदा नवी मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कामोठे, कोपरखैरणे, पनवेल शहर, रबाळे आणि कळंबोली पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे नोंदविण्यात आले असून या घटनेनं आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.