विधानसभा निवडणुकीसाठी काल निकाल जाहीर झाला असून महायुती बहुमताने निवडून आल्यानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू झाली आहे. नव्या सरकारच शपथविधी सोहळा सोमवारी वानखडे स्टेडियमवर पार पडणार आहे. निकालानंतर पुढील 48 तासात सरकार स्थापन करणे बंधनकारक आहे. महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे एकूण 41 जागा जिंकून आल्या आहेत, 55 पैकी 41 जागा जिंकून आल्या असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट जास्त आहे. यामुळे मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.