मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कर्जतमध्ये जाहीर सभा होणार आहे. कर्जत मतदारसंघातील विविध विकासकामांचा, लोकार्पण सोहळ्याचा भूमिपूजन आणि उद्घाटनदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. शिंदे गटाचे आमदार थोरवे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. कर्जत मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २७२ कोटींचा विकास कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.