चेंबूर येथे घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपी गणेश चंद्रकांत हांडोरे याला अपघातग्रस्त गाडी लपविण्यासाठी आणि फरार होण्यासाठी मदत करणारे त्याचे वडील खासदार चंद्रकांत हांडोरे यांना देखील अटक करावी, अशी मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
तसेच या संपूर्ण दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणीही शेवाळे यांनी केली. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या गोपाळ आरोटे या तरुणाची चेंबूरच्या झेन रुग्णालयात जाऊन शेवाळे यांनी भेट घेतली आणि त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.