व्हिडिओ

Central Railway News: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; गितांजली एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड

Published by : Dhanshree Shintre

मध्य रेल्वे ची वाहतूक विस्कळित झाली आहे. गीतांजली एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने टिटवाळा स्थानकात थांबली. यामुळे कसारा कल्याण अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा ठप्प झालेली आहे. बिघाड दुरुस्त झाला असला तरी लोकल सेवा 10 ते 15 मिनिट उशिराने धावत आहे. एक्सप्रेस जागीच खोळंबून राहिल्याने या एक्सप्रेसच्या मागे धावत असलेल्या कसारा लोकल आणि इतर एक्सप्रेस गाड्या शहाड, कल्याण रेल्वे स्थानक परिसरात खोळंबून राहिल्या.

मुंबई ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरातून शहापूर, कसारा, आडगाव भागात नोकरी निमित्त जाणाऱ्या नोकरदारांचे यामुळे हाल झाले. बराच उशीर लोकल एकाच जागी खळंबून राहिल्याने प्रवासी संतप्त झाले. कल्याणमधून भाजीपाला घेऊन जाणारे किरकोळ विक्रेतेही लोकलमध्ये अडकून पडले.

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू