साखरेच्या निर्यातीवर बंदी येण्याची शक्यता आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु झाल्या असून साखरेवर निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता आहे. गहू आणि तांदळानंतर देशात साखरेच्या निर्यातीवर बंदी घालणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे.
आगामी काळात केंद्र सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. नव्या हंगामात साखर कारखान्यांकडून होणाऱ्या साखरेच्या उत्पादनावर निर्यात बंदीची शक्यता आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून देशभरात ऊस गाळपाचा नवा हंगाम सुरू होणार त्याआधी हा निर्णय होण्याची शक्यता आहे.