आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महालक्ष्मी रेस कोर्स वरील थीम पार्कला मान्यता देण्यात आली आहे. रेसकोर्सवर जागतिक दर्जाचं थीम पार्क उभारलं जाणार आहे. रेसकोर्स वरील 320 एकरावर जागतिक दर्जाचं थीम पार्क उभारण्याचा सरकारचा मानस होता.
कोस्टल रोडची रिक्लेम केलेली २०० एकर जमीन आणि रेसकोर्सची १२० एकर जमीन अशा ३२० एकर जमिनीवरचं जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क विकसित केलं जाणार आहे. लोकसभा निवडणुक आचारसंहिता लागण्याच्या आधीच थीम पार्क चा मार्ग मोकळा केला जाणार आहे. महालक्ष्मी रेस कोर्स वरती थीम पार्क नको म्हणून आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोध केला होता. महालक्ष्मी रेसकोर्स वरील थीम पार्क चा कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिल जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.