बजेटनंतर शेअर बाजारात देखील महत्त्वाचे मोठे परिणाम दिसत आहेत, पडझड झालेली आहे. सेन्सेक्स 550 कोसळला तर निफ्टी 200 अंकांनी घसरला आहे. अर्थसंकल्पाचे परिणाम शेअर बाजारावर देखील झालेले आहेत. यामुळे आता गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे.
गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. फक्त 11 शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत तर बँक, आयटी, मेटल आणि फायनान्स एका सत्रात सर्वाधिक खेचले गेले ज्यामुळे सर्व निर्देशांक रेड झोनमध्ये सापडले. तसेच अॅक्सिस बॅंक, इन्फोसिस आणि टीसीएस यात सर्वाधिक वाढ झालेली आहे, तर याचसोबत एचडीएफसी बॅंक, नेस्ले आणि एशियन पेंट यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे शेअर बाजाराला बजेटचा फटका बसला आहे. तर गुंतवणूकदारांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.