न्याय देवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढली तर न्याय देवतेच्या हातात तलवारी ऐवजी संविधान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यापुर्वी न्याय देवतेच्या डोळ्यांवर पट्टी होती न्यायदेवतेच्या हातात तलवार होती मात्र आता न्याय देवतेच्या डोळ्यांवरील पट्टी आणि हातातली तलवार काढून आता हातात संविधान दिले जाणार आहे.
यावर ज्येष्ठ वकील माजीद मेमन यांनी आपली प्रतिक्रिया देत सांगितलं की, न्याय देवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढण्याचा मुख्य हेतू हा असा आहे की, कोणत्या ही वकीलाने गुन्हा होताच तो कोणा सोबत झाला आहे किंवा तो गुन्हा कोणी केला आहे हे लक्षात न घेता गुन्हेगार जो असेल त्याला त्याची शिक्षा द्यावी असं आहे.
तसेच यापार्श्वभूमीवर वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम हे म्हणाले की, निश्चतपणे हा एक क्रांतीकारक निर्णय आहे असं मला वाटतं. कारण, गेल्या काही वर्षापासून न्याय देवतेने आपल्या समोर येणारी कोणती ही व्यक्ती असो याचा विचार न करता न्याय दिला पाहिजे, ही जी संकल्पना होती त्या संकल्पनेला एक वेगळे वळण आणि याचा अर्थ म्हणजे न्याय देवतेने आता डोळे उघडले पाहिजे. तसेच आपल्या समोर येणाऱ्या लोकांना न्याय देताना त्यांचे आचरण कसे आहे हे देखील न्यायाधीश तपासू शकतात. दुसर म्हणजे तलवार, तर तलवारीने कोणाला मारायचं नाही आहे तर संविधानानुसार न्याय द्यायचा आहे ही एक चांगली संकल्पना या निमित्ताने मुख्य न्यायाधीशांनी घेतली आहे. अशी प्रतिक्रिया वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.