विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं विशेष प्लॅनिंग पाहायला मिळत आहे. सहप्रभारी अश्विनी वैष्णव मुंबईकडे विशेष लक्ष देणार आहेत. मुंबईच्या 36 मतदारसंघासाठी त्यांच्या बैठका होणार आहेत आणि ते रणनीती ठरवण्याची माहिती समोर येत आहे. एकिकडे मविआ तयारीला लागली आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष असलेला भाजपकडून सुद्धा विशेष तयारी सुरु आहे. कारण देशामध्ये एनडीएचं सरकार आहे.
मात्र राज्यामध्ये लोकसभेचा जो निकाल लागलेला आहे त्यानंतर एक मोठा धक्का भाजपला मानला जात आहे. तसा निकाल आता विधानसभेमध्ये भाजपसाठी परवडणार नाही. त्यामुळे भाजपकडून ताकद पणाला लावली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभेमध्ये सर्वाधिक मतं मिळालेलं मतदारसंघ आणि ज्याठिकाणी मताधिक्य मिळालेलं नाही असे मतदारसंघ याची वर्गवारी करुन नीती ठरवली जाणार असणार माहिती समोर येत आहे.